बातमीपत्र

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात असलेल्या सरहद्द वडगाव येथील रामकिसन बोडखे यांनी अनोखा प्रयोग केला दुष्काळामध्ये मंठा तालुक्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी तरसलेली असताना यांनी स्वखर्चातून आपल्या स्वतःच्या मालकीच्या विहिरीतून गावाला पाणी सोडले यामुळे गेल्या दोन महिन्यापासून गावाची तहान भागलेली आहे रामकिसन बोडखे यांनी राबवलेल्या या अभिनव प्रयोगाचे सर्वत्र स्वागत होत आहे त्यांच्यामुळे आज दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाची तहान भागली आणि या भयंकर दुष्काळामध्ये लोकांना पिण्याचे पाणी मिळाले रामकिसन बोडखे हे राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांचे निकटवर्तीय मानले जातात याच कारणामुळे कदाचित त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावामध्ये पाणीटंचाई दिसू नये म्हणून स्वखर्चाने गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा