परतूर मंठा तालुक्यातील शंभर गावांना एक महिन्यात मिळणार फिल्टर चे पाणी तर मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी लवकरच मराठवाडा वाटर ग्रिडचे काम सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.इस्राईल आणि गुजरातच्या धर्तीवर राज्यातील पहीला वाटर ग्रिडचा प्रकल्प हा जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यातील 176 गावात संयुक्त होत आहे.या प्रकल्पाची हायड्रोलिक चाचणी पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांच्या उपस्थिती मध्ये घेण्यात आली.यावेळी त्यांनी सर्व कामकाजाची पाहणी करत एक महिन्याच्या आत तालुक्यातील शंभर गावांना केवळ सात रुपयात एक हजार लिटर पाणी मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
