मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या महाजानदेश यात्रेची महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक अशी सभा परतूर विधानसभा मतदार संघातील मंठा येथे संपन्न झाली यावेळी मुस्लिमबांधव,बंजारा,धनगर,ओबीसी आणि मराठा समाजातील नागरिकांनी मुख्यमंत्री येत असलेल्या रस्त्यावर पाच किलोमीटर पर्यंत रांगा करून गुलाबांच्या फुलांनी पुष्पवृष्टी करून उस्फूर्त पणे स्वागत केले.पन्नास हजारांवर महिला आणि पुरुष या यात्रेत सहभागी झाले होते,ठिकठिकाणी मुख्यमंत्री यांचे औक्षण करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर,केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल लोणीकर होते उपस्थित होते.
