बातमीपत्र

१ महीना आपण पक्षासाठी वेळ द्यावा असे आवाहन भुदरगड भाजपाचे अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले

आगामी विधानसभा निवडणूकीत कोल्हापूरचे पालकमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नाम. चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशाप्रमाणे आपण काम करायचे असून भाजपाचे सरकार महाराष्ट्रात येण्यासाठी उद्याचा १ महीना आपण पक्षासाठी वेळ द्यावा असे आवाहन भुदरगड भाजपाचे अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले..
     आकुर्डे जि.प. गटातील प्रमूख कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमूख यांच्या बैठकीत ते बोलत होते. तर मौनी विद्यापिठ सदस्य अलकेश कांदळकर, कोजिमाशिचे माजी चेअरमन प्रा. हिंदूराव पाटील, संतोष पाटील, प्रविण नलवडे प्रमुख उपस्थित होते..
      कोल्हापूरचे पालकमंत्री नाम.चंद्रकांत दादा पाटील यांचा हा घरचा मतदारसंघ असल्याने यावेळी  राधानगरी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने लढवावा अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली..
    यावेळी कुर पंचायत समिती मतदार संघातील के.बी. देसाई, विनायक शिंदे, अमृत गुरव ( कुर )  नेताजी पाटील, जीवन पाटील, पांडुरंग वायदंडे, शिवाजी पाटील ( नाधवडे ) निवास देसाई (टीक्केवाडी ) तानाजी पाटील, दिपक पाटील ( कोनवडे )     विनायक शिंदे,एकनाथ पाटील(निळपन),सचिन देसाई(म्हसवे).... 
तर आकुर्डे पंचायत समिती मतदार संघातील
पी बी खुटाळे(मोरेवाडी),
सुनील तेली, संदीप कुंभार (शेणगाव),प्रवीण पाटील,सुनील लोहार (आकुर्डे),रवींद्र पाटील(फये),अशोक चौगले,संजय मोरे(महालवाडी),सचिन हाळवणकर, युवराज कांबळे, चंद्रकांत नलवडे(भाटीवडे),प्रकाश पाटील(कोळवण),अंकुश सारंग(लोटेवाडी),सतीश गायकवाड(बोंगार्डेवाडी) प्रकाश पाटील ( कोळवण ) नामदेव खतकर (नवरसवाडी )
यांचे सह शक्तीकेंद्रप्रमूख व बुथ प्रमुख मोठ्या संखेने उपस्थित होते..
स्वागत युवा मोर्चाचे तालुकाअध्यक्ष रणजित आडके यांनी केले तर आभार  संजय मिटके (दारवाड) यांनी मानले...


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा