गीतादेवी खंडेलवाल इंस्टीट्युट ऑफ फार्मसी अकोला येथे संविधान दिवस उत्साहात साजराकरण्यात आला.हा कार्यक्रम साजरा करण्यामागचा उद्देश असा कि विद्यार्थ्याना संविधान बद्दल माहिती मिळावी तसेच आपले अधिकार व कर्तव्या बद्दल जाणीव व्हावी.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र पाटील यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल व संविधानाला कसे पूर्णरूप दिले व ते कधीपासून आम्लात आणले या बद्दल माहिती दिली.यावेळी प्रा. कुलकर्णी व देवेंद्र थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य प्रा.राजेंद्र पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.एस.एस.कुलकर्णी अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन प्रा.सौ. छाया गजभिये यांनी केले.
