वृक्षमित्र आवलिया भगवानराव नागरे यांच्या झाडे लावून झाडे जगविल्याने शासनाने दखल घेऊन त्यांना पुरस्कार द्यावा अशी मागणी गावकरी करत आहेत.खळेगाव हे लोणार तालुक्यातील ५ हजर लोकवस्ती असलेले गाव असून येथील शेतकरी भूमिहीन व बायपास सर्जरी होऊन सुद्धा झाडावर अतिव प्रेम असल्याने त्यांनी खळेगाव येथील जगदंबा माता जवळील इक्लास जमिनीवर विविध प्रकारची फळझाडे व औषधी झाडे लावली व या जमिनीवर जेमतेम १० हजार झाडे लावून त्या झाडांना जगविण्यासाठी बायकोचे सर्व दागिने मोडून या झाडांसाठी लाखो रुपये खर्च करून कुंपण तयार केले.झाडांची जोपासना केली हे सर्व करत असताना आज त्यांच्यावर कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असताना या वृक्षमित्र अवलिया कडे शासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.एकीकडे करोडो रुपये शासन झाडे लावण्याकरिता उधळत आहे झाडे लावली जातात परंतु त्यांची निगा राखली जात नाही अशातच एक अवलिया वृक्षासाठी आपले व कुटुंबाचे दागिने मोडून नंदनवन उभेकरत आहे त्याकडे सरकार कधी लक्ष देईल असा प्रश्न लोणार तालुक्यातील जनतेला पडला आहे.शासनाने लवकर या कडे लक्ष द्यावे अशी मागणी गावकरी करत आहेत.
