संपूर्ण जगाला कोरोना या आजाराने विळखा घातला असून या संसर्गजन्य आजारा मुळे जगातील लाखो लोकांना या आजाराची लागण झालेली असून बऱ्याच लोकांचा मृत्यू या आजाराने झाला आहे. या आजाराची फैलाव व त्याची भीषणता लक्षात घेता सगळीकडे भीतीचे वातावरण असून या आजारामुळे सर्वकाही जनजीवन विस्कळीत झालेले असून लॉकडाऊनमुळे शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघाले आहे. लॉकडाऊन मुळे पुढे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला असून मार्च ते मे हा परीक्षेचा कालावधी आणि नेमक्या या कालावधीमध्ये लॉक डाऊन यामुळे परीक्षा केव्हा होणार? पेपर तपासणी केव्हा? निकाल केव्हा? पुढील प्रवेशाचे काय? याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत लक्षात घेऊन गीतादेवी खंडेलवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्रो. पाटील सर यांच्या कल्पनेतून "वर्क फ्रॉम होम"ला साजेसा अभिनव उपक्रम त्यांना ऑनलाइन पद्धतीने झूम ॲप द्वारे अध्यापनाचे धडे देण्याचे नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये गीतादेवी खंडेलवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने घेतला ही संस्था शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर असते त्यानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून द्वारे ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचेवर्ग भरवून अध्यापनाचे कार्य करण्यासाठी प्राध्यापकांना प्रोत्साहित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पाटील, प्रो.रणजीत आडे,प्रो. श्रीश मराठे,प्रो. छाया गजभिये, प्रो.खडतकर सर व प्रो. केशवाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अध्यापनासाठी वर्ग भरविण्यात येत असून हा उपक्रम यशस्वीपणे सुरु आहे व काही शैक्षणिक व्हिडिओ यूट्यूब वर अपलोड करण्यात आले असून विविध विषयांच्या अभ्यासाच्या नोट्स असाइन्मेंट व प्रश्नावली विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे जून पर्यंत ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करून ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे प्राध्यापक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करीत असून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अध्यापनात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन अध्यापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून अध्यापनाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक फायदा असून पुढील वर्गांमध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे.
