बातमीपत्र

संत विचारानेच उद्याची सक्षम पिढी घडू शकते-राहुल लोणीकर यांचे प्रतिपादन

संत विचारात समाजपरिवर्तनाची ताकत असून  संत विचाराने  सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल घडून येतो  विकासासाठी  संतसंगती  शिवाय  पर्याय नसून उद्याची शिक्षण पिढी घडवायची असेल तर त्यासाठी संत विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले 

लिंबखेडा  तालुका मंठा  येथे परमपूज्य गणपत गुरुजी पुण्यतिथी व दत्ता रोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित तीनदिवसीय सत्संग समारोह कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी तालुकाध्यक्ष गणेशराव खवले बाबूलाल पवार दतराव कांबळे गजानन देशमुख शिवदास हनवते अविनाश राठोड मुस्तफा पठाण दारासिंग चव्हाण जिजाभाऊ झोल पीबी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की मागील अनेक वर्षापासून आपण स्वतः परमपूज्य गणपत गुरुजी आणि दत्ता महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी आवर्जून येत असून यापुढे देखील आपण गुरुजींच्या आशीर्वादासाठी प्रत्येक वेळी येणार आहे असे सांगत संस्थानचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे असेही राहुल लोणीकर पुढे बोलताना म्हणाले

सर्वसामान्य माणसाला प्रगतीचा मार्ग दाखवण्याचे काम संत महात्म्यांनी केला असून सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपणही समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून प्रयत्नशील असून निश्चितपणे संत वचनाप्रमाणे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करणार आहोत संत-महात्मे आकडे प्रचंड दूरदृष्टी होती त्या दुरुस्त च्या माध्यमातून त्यांनी भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज शेकडो वर्षापूर्वी व्यक्त केला होता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत सेवालाल महाराज यासारख्या अनेक संत महात्म्यांनी महापुरुषांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा मार्ग सांगितला असून त्या मार्गाने सर्वांनी मार्गक्रमण केल्यास निश्चितपणे आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो असेही यावेळी राहुल लोणीकर यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा