नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड यांच्या संशयित मृत्यूची सी बी.आय.मार्फत चौकशी करावी व मृत्यूस कारणीभूत असणारे संशयित राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मिथिलेश उमरकर व त्याचे साथीदार यांच्यावर मनुष्यवधाचा व ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी आदी मागण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे देण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे,डॉ.आनंद गुरव,स्मिताताई दिघे,रमेश कांबळे, मिलिंद सनदी,दशरथ कांबळे, जिल्ह्याच्यानेत्या योगिता बोकणे आदि उपस्थित होते.
