<span style="\"color:rgba(0," 0,="" 0.87);="" font-family:roboto,noto,sans-serif;="" font-size:15px\"="">कोल्हापूर मध्ये सचिन सुपर स्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या थेट भेट या हृदयस्पर्शी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.व्ही.टी.पाटील भवन कमला कॉलेज येथे मेळावा संपन्न झाला.डॉ.सचिन पाटील यांनी हृदयरोगआणि त्याविषयी घ्यावयाची काळजी यासंबंधी मार्गदर्शन केले.पेशंटची कोणत्या प्रकारे काळजी घ्यायची याविषयी माहिती दिली तसेच कोविड विषयीसुद्धा योग्य मार्गदर्शन केले.या मेळाव्यामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.या मेळाव्याला डॉ.सचिन पाटील त्वचारोग व सौंदर्य उपचार तज्ज्ञ डॉ.इरफान शेख डॉ.सदानंद दड्डीकर डॉ.सतीश गोसावी डॉ.अरुण पाटील डॉ.सचिन कुंभार डॉ.सुनील पाटील व डॉ.विकास बामणे यांच्यासह हॉस्पटिल स्टाफ व नागरीक प्रचंड संख्येने उपस्थित होते.
