सध्याच्या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे वाकी घोल परिसरातील 11 वाड्या वस्त्या मध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढले वाढले होते .या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली आणि ग्रामपंचायत सावरदे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले .या शिबिरामध्ये आडोली येथे 183 व सावरदे येथे 148 रुग्णांवर उपचार करण्यात आले .या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर मधुकर तोडकर , डॉक्टर बाळकृष्ण होशिंग डॉक्टर मगदूम,यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही पी पाटील यांनी आरोग्य शिबिराच्या आयोजनाचा हेतू सांगितला .या शिबिराला श्री चिन्मय जोशी, आडोली ग्रामपंचायत चे सरपंच श्री शिवाजी पाटील
सावर्दे ग्रामपंचायत चे सरपंच श्री तुकाराम यादव ,पोलीस पाटील धनाजी कांबळे ,सदाशिव सुतार पत्रकार शिवाजी केसरकर , श्री संपत मोहिते,श्री सुरेश मुडे,गुरुनाथ कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
