राधानगरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय या शाळेतील दुबळे वाडी गावचा विद्यार्थी हर्षवर्धन जयवंत पाटील..
4 महिने प्रचंड प्रमाणात पाऊस असून देखील भाला फेक स्पर्धेसाठी त्याने जिद्दीने सराव केला.शाळेचे क्रीडा शिक्षक श्री शरद पाटील सर यांनी दररोज त्याचा सराव करून घेतला व योग्य मार्गदर्शन केले..
अगदी रविवारी सुद्धा सरावात खंड पडू दिला नाही.या परिश्रमाचे फळ म्हणजे आज कोल्हापूर जिल्हा स्तरीय भाला फेक स्पर्धेत हर्षवर्धन चा द्वितीय क्रमांक आला.
आणि आता त्याची विभागीय स्तरावर सातारा येथे स्पर्धे साठी निवड झाली आहे.शाळेचे क्रीडा शिक्षक श्री एस सी पाटील सर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.. तर संस्था सचिव श्री अतुल जोशी साहेब यांची प्रेरणा मिळाली आहे.क्रीडा शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक श्री विद्यानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
