छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने वडगांव सरहद येथे भव्य दिव्य गांवामध्ये दिंडी काढण्यात आली. मंठा तालुक्यातील वडगांव सरहद येथे शिवजयंती निमित्ताने जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालय वडगाव सरहद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने वडगांव सरहद येथे भव्य दिव्य गांवामध्ये दिंडी काढण्यात आली यामध्ये भजनी मंडळी व गांवकरी मंडळी तरुण मंडळ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
