दिनांक 01/08/18 रोजी बुलडाणा अर्बन शाखा दुसरबीड येथे शाखेतील सभासद श्री जालिंधर सांगळे यांनी रोख रक्कम जमा करनेसाठी रोखपाल श्री गजानन सुरुषे यांचे कड़े दिली असता त्यात तब्बल एक लाख रुपये शिल्लक होते.
श्री.गजानन सुरूशे यांनी क्षणातच जास्तीचे आलेले एक लाख रुपये श्री.जालिंधर सांगळे यांना परत केले. त्यांचा प्रामाणिकपना पाहता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रभाकररावजी ताठे मामा व सर्व सन्मानिय सदयस्य तसेच प्रतिष्ठित सभासदानी श्री सुरुषे यांचा दिनांक 8/8/18 रोजी शाखा दुसरबीड येथे येऊन शाल श्रीफ़ळ देऊन सत्कार केला व प्रामानिकतेचे कौतुक केले त्यावेळेस स्थानिक संचालक श्री.ताठे मामा ,श्री.निवृत्ती वायाळ शेठ,श्री.वसंतरावजी जायभाये सहाय्यक शाखा व्यस्थापक श्री.रविन्द्र सानप,श्री.गजानन सानप, श्री.दिनकर शेवाळे, श्री.लक्ष्मण रायमुल व दीपक वाठोरे उपस्थित होते.
