बातमीपत्र

मेहकर येथे आदिवासी अस्मिता संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचार विरोधात व आरक्षण बाबतीत भव्य मोर्चा जानेफळ फाटा ते तहसील कार्यलय पर्यंत काढण्यात आला.हजारो महिलांच्या व पुरुषाच्या उपस्थित हा मोर्चा निघाला होता महाराष्ट्र शासना च्या विरोधात घोषणा देत ह्या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभे मध्ये झाले स्वातंत्र्य मैदान येथे सभा घेऊन त्या नंतर उपविभागीय अधिकारी कार्यलय येथे नायाब तहसीलदार मगर मॅडम यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी श्री रामकीसन डाखोरे,उत्तमराव माव्हरे,उत्तमराव डुकरे,सुकनंदन हांडे,दशरथ करवते, रामेश्वर शिंदे,तुकाराम ढोके व पदाधिकारी उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा