बातमीपत्र

CM चषक स्पर्धेचा मुख्य उद्देश तरुणांमधील कलागुणांना चालना देणे - प्रा.प्रकाशजी गवई

तरुणांमध्ये असंख्य कलागुण असतात परंतु अनेकदा या बाबतीत विद्यार्थी व पालक हे अनभिज्ञ असतात त्यामुळे तरुणांमधील कलागुणांना विकसित करून चालना देणे व या शालेय विद्यार्थ्यांन मधुन समाजशील माणूस घडविणे हा CM चषक स्पर्धा आयोजित करण्या मागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे मेहकर विधानसभेचे नेते प्रा.प्रकाशजी गवई यांनी महेश विद्या मंदिर मेहकर येथे आयोजित CM चषक स्पर्धेतील रांगोळी स्पर्धेतील  विजेत्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन करताना केले यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा शहराध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश विद्या मंदिर मेहकर चे अध्यक्ष डॉ सुभाषजी लोहिया,भाजपा किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सिताराम ठोकळ,अजीम मामु जहागिरदार, किरण जोशी, माजी नगराध्यक्ष अशोक आडेलकर,भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा पार्वती कान्हे,युवा नेते राजाभाऊ भिसे,भाजयुमोचे राजेश निकम,गोपाल महाराज पितळे आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना प्रकाश गवई म्हणाले की खेळाच्या माध्यमातून माणूस सदैव उत्साही राहतो व शारीरिक तंदुरुस्ती बरोबर माणसाचे मन सुध्दा निरोगी राहते व माणसाचा आत्मविश्वास वाढीस लागतो आणि माणसामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मनगटात ताकद असली की माणूस जगातील कोणत्याही कामात विजय मिळवु शकतो. या रांगोळी स्पर्धेत एकूण 30 चमु म्हणजेच 90 विद्यार्थी विद्यार्थ्यांनींनी सहभाग घेतला होता त्यामध्ये मधुरा सुभाष लोहिया हिच्या नेतृत्वाखालील चमुने प्रथम क्रमांक  तर गंगा सपकाळ हिच्या नेतृत्वाखालील चमुने द्वितीय क्रमांक  व जागृती उमाळकर हिच्या नेतृत्वाखालील चमुने तिसरा क्रमांक पटकाविला या स्पर्धेत पंच म्हणून पार्वती कान्हे,आकाश घोडे व ठोकळ महाराज यांनी काम पाहिले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंदन अडेलकर,अविनाश लाड,सागर गवई,विनोद तायडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश घोडे यांनी तर आभार प्रदर्शन अल्ताफ कुरेशी  यांनी केले.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


आमच्यात सामील व्हा