स्कॉर्पिओ व ट्रक मध्ये भीषण अपघात अंजनी बु ता मेहकर येथील एकाच कुटुंबातील 6 जण अपघातात मृत झाले असून हा अपघात महू येथून परत येत असताना अंजनी गाव हे केवळ 2 की अंतर असताना शेरे पंजाब हॉटेल समोर रात्री ३ च्या दरम्यान हा अपघात झाला असून गाडी मध्ये 8 पैकी 6 जण ठार झाले.अपघात खूप भीषण असल्यामुळे डोंनगाव पोलीस कर्मचाऱयांनी जे सि बी मशीनच्या सहाय्याने मृतदेह काढले.मृतक मनोहर कुंडलिक जुमडे वय 50 गोलू मनोहर जुमडे 22 जयवंत श्रीरंग जुमडे ६० कमल विश्वास जुमडे ४० हे जागीच मृत पावले व 1 वर्षाचा मुलगा व २० वर्षाची महिला यांना औरंगाबाद येथे उपचारा करीता नेत असताना मृत पावले 3 जण जखमी असून मेहकर मल्टि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
