बातमीपत्र

राजेगावं या गावात ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.रस्त्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.गावातील प्रत्येक रस्त्यावर पाणी आणि चिखल तसेच जागोजागी पाणी साचलेलं आहे.ग्रामपंचायत कडून यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना झालेली नाही असे ग्रामस्थ सांगत आहे. गावंकरी यांनी वारंवार निदर्शनास आणून देखील ग्रामसेवक आणि सरपंच याकडे दुर्लक्ष करत आहेत.स्मशानभूमीत जायला रस्ता नाही,आरोग्य केंद्र गावात असुनही प्राथमिक उपचार होत नाहीत,आरोग्य केंद्र नेहमी बंदच दिसते.तरुणाला सर्पदंश झाला, त्याला गावात आरोग्य केंद्र असुनही प्राथमिक उपचार मिळाला नाही. परिणामी त्या तरूणाला आपले प्राण गमवावे लागले.एकंदरीतच गावात चिखल आहे का चिखलात गांव आहे असाप्रश्न सर्व सामान्य माणसाला पडतो.या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,स्वच्छतेच्या नावाखाली एवढा निधी सरकार देत असताना या गावात घाणीचे साम्राज पाहायला मिळत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा