बातमीपत्र

 सिंदखेडराजा मतदार संघात दुसरबीड येथे वंचित बहुजन आघाडीची सभा आयोजित करण्यात आली या सभेला अंजलीताई आंबेडकरया प्रामुख्याने उपस्थित होत्या उमेदवार सविताताई मुंढे यांच्या प्रचार सभेला मतदारांची गर्दी पहायला मिळाली एकंदरीतच वंचित बहुजन आघाडीला पुरक असे वातावरण सिंदखेडराजा मतदार संघामध्ये आहे कारण या मतदारसंघातील सूतगिरणी कारखाने बंद असल्याने येथील तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे हा मतदारसंघ एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा बालेकिल्ला ते या मतदार संघातून तीन वेळा आमदार झाले होते परंतु मोदीलाटेत त्यांचा पराभव होऊन या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार शशिकांत खेडेकर निवडून आले होते. परंतु या विधानसभेला सिंदखेडराजा मतदार संघात सविताताई मुंढे यांचा प्रचार जोरात सुरु आहे.


आमच्यात सामील व्हा