गेले १५ दिवस कोल्हापूर मधे मटण दर वाढ विरोधात अंदोलन चालू होते आज या अंदोलनाची गोड सांगता खाटिक समाजील अध्यक्षांना पेढा भरवून शिवाजी मंदीर, शिवाजी पेठ येथे झाली...
मा. श्री महेश जाधव अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) दे.व्य.स.प.म यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये खाटीक समाजाचे अध्यक्ष विजय कांबळे, सर्व मटण विक्रेते, मान्यवर उपस्थित होते तसेच सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने आर के पवार, सुजितभाऊ चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, अजित राऊत, चंद्रकांत यादव, बाबा इंदुलकर, सुरेश जरग,आदि मान्यवर व कोल्हापूर मधील नागरीक उपस्थित होते.
या बैठकी मध्ये सर्वानुमते प्युअर मटण दर ४८० रु किलो मंजुर करणेत आला असुन कोल्हापूर करांना एक चांगला दिलासा मिळाला आहे.
