बातमीपत्र

बुलडाणा : कोरोना मुळे बुलडाण्यात काल मृत पावलेल्या व्यक्तीचा नातेवाईकांचीही होणार तपासणी

बुलडाणा, 29 मार्च : ज्या गोष्टीची भीती होती,तीच आता बुलडाणेकरांच्या वाट्याला आली आहे.बुलडाण्यात काल मृत पावलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.धक्कादायक बाब म्हणजे सदर रुग्ण दोन दिवस शहरातील एका खाजगी रुग्णालयात भर्ती होता.शनिवारी येथील जिल्हा रुग्णालयात त्याला हलविण्यात आले होते.तासाभरात त्याचा मृत्यू झाला होता.त्याचा दफनविधी ला 40 ते 50 नातेवाईक गेले होते अशी माहीती मिळाल्याने त्यातील जवळपास 28 जन येथील जिल्हा रुग्णालयात आनले आहेत त्या सर्व नातेवाईकांची तपासणी करण्यात येणार आहे,जे या व्यक्तिच्या दफनविधी ला हजर होते त्या सर्व लोकांची शोधमोहीम चालू असुन तो रुग्ण ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता ते आशिर्वाद हाॅस्पीटलही काही काळासाठी बंद करून तेथील सर्व कर्मचारी यांची तपासणी करण्यात येणार असल्याची  माहितीही जिल्हाशल्य चिकित्सक डाॅ प्रेमचंद पंडीत यांनी दिली आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा