लोणार तालुक्यातील बिबी येथील सर्पमित्र चेतन चव्हाण व त्यांचे सहकारी सर्पमित्रांनी शिवनी पिसा येथून दिनांक 25 जून रोजी कोब्रा जातीच्या सापाची 18 अंडी आणली होती. सोळा दिवसानंतर त्या अंड्यातून सापांच्या पिल्लांनी जन्म घेतला. त्या पिल्लांना दुसऱ्या दिवशी सर्प मित्रांकडून वन विभागाच्या जंगलात सुरक्षित सोडून त्यांना जीवनदान देण्यात आले.
