बातमीपत्र

बुलढण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करून भाजपा लोणार येथील कार्यकर्त्यांनी केला निषेध... पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रीय मंत्रालय व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडनणविस यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाचे विधान केल्यामुळे भारतीय जनता पार्टी लोणार तालुक्याच्या वतीने सुल्तानपूर चौकात आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले व घोषणा देत त्यांचा निषेध करण्यात आला या वेळी भाजपा लोणार तालुका अध्यक्ष मा.बाबरावजी मुंढे व कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली भाजपा लोणार तालुका अध्यक्ष मा.बाबरावजी मुंढे,ता.सरचिटणीस गणेश तांगडे,किसान सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरुशे,झोपडपट्टी सेल चे तालुका अध्यक्ष प्रल्हाद मोरे,गुलाब भानपुरे,ज्ञानेश्वर शिंदे, डिगंबर सुरुशे,गोपाळ ढवळे,जगन खोलगडे इ.कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा