लोणार तालुक्यातील ५ हजार लोकसंखेचे खळेगाव हे गाव असून येथे कुठल्याच प्रकारची आरोग्य सुविधा नाही हे आज उघड झाले कोरोना सारख्या असाध्य रोगाने देशामध्ये थैमान घातले असून ठिकठीकाणी युद्ध पातळीवर कोविड सेंटर उघडले जात आहेत ठिकठीकाणी नवीन दवाखाने तयार केले जात आहेत पण यामध्ये खळेगाव येथील आरोग्य उपकेंद्र बांधून तयार आहेत परंतु येथे आरोग्य सेवक व सेविका सुद्धा नाहीत.शासनाने या अगोदर सुद्धा लाखोरुपये खर्च करून आरोग्य उपकेंद्र तयार केले होते पण त्याचे सुद्धा उद्घाटन झाले नाही तसेच या पण आरोग्य उपकेंद्राचे होते कि काय? हे उपकेंद्र गावातील लोक मेल्यावर सुरु करणार कि काय असा संतप्त सवाल जनता प्रशासनाला विचारात आहे. जर हे उपकेंद्र येत्या ८ दिवसात सुरु झाले नाहीतर जनता रस्त्यावर उतरून कोरोनाच्या काळात आंदोलन करेल याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशा
