मॅक्झीलोफेशियल सर्जन डाॅ कैलास गवई यांनी बुलडाणा जिल्ह्यातील पहीली म्युकरमायकाॅसीसची(काळी बुरशी) शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे,कोविड संसर्गा नंतर अनेक जिल्ह्यांमध्ये म्युकरमायकाॅसीस या आजाराने अनेकांना ग्रासले आहे,या आजाराने बुलडाणा जिल्ह्यातील अनेकांना ग्रासले आहे,हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर आहे,कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते.कोरोनाबाधीतांना उपचार दरम्यान विनाकारण किंवा जास्त प्रमाणात दिले गेलेले स्टिराॅईड व टोसिलीझुमाब नावाचे औषधामुळे या आजाराचे प्रमाण वाढले आहे.नाक बंद वाटणे,नाकामधुन रक्तमिश्रित पाणी येणे,चेहर्यावर सुज येणे, दुखणे,डोळा सुजणे,एक प्रकारचा नाकाच्या आजुबाजुला बधीरपणा येणे,दिसायला कमी वाटणे,डोळ्यांची हालचाल कमी जाणवणे, दिसायला कमी जाणवणे, दोखेदुखी, ताप येणे,दात हलणे, हिरड्यांमधुन पु येणे,असे लक्षणे या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये असतात,त्यामुळे रुग्णांनी लवकर निदान व योग्य उपचार वेळेवर घेणे महत्वपूर्ण असल्याचे मतही डाॅ कैलास गवई यांनी मांडले
