बुलढाणा येथील वन विभाग अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे बुलडाणा तालुक्यात अंबा, लिंब,काटेरी व साधी बाभूळ या सारख्या महाकाय वृक्षासह लाखों रुपये किमतीच्या सागवान झाडांची बेकायदेशीररित्या कत्तल केली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.घाटनांद्रा,साखळी,दुधा, शिवारातील सागवान तस्कराकडून संबंधित शेतक-याच्या सहमतीने सागवान झाडांची कत्तल होत आहे. झोपेचे सोग घेतलेल्या वन विभाग या संदर्भात कारवाई करणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात अनेक वर्षापासून भले मोठे महाकाय वृक्ष आहेत.त्यामुळे परिसरातील अनेक शेतक-यांनी आपल्या शेतात या वृक्षाची जोपसणा करण्यासह जास्त उत्पन्न देणारे सागवान वृक्षाची लागवड केली.सागवान वृक्ष तोंडीसाठी शासनाने काही निर्बंध घातले आहेत.त्यामध्ये झाडाची लागवड केल्यावर त्याची सातबारा उतारावर नोंद घेणे,वन विभागास त्याची महिती देणे,झाडे तोडण्यापूर्वी त्याचा रीतसर परवानगी घेऊनच झाडे तोडावी अशी नियमावली आहे.असे असताना बुलडाणा तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिनबोभाटपणे सागवान झाडाची कत्तल केली जात असल्याचे पहावयास मिळत आहे.काही दिवसापूर्वी एका वन कर्मचाऱ्याला सागवान झाडांची कत्तल करतांना रंगेहाथ पकडले होते.ही घटना घडूनही वन विभागाने दुर्लक्ष केल्याने वन विभागाच्या अधिका-यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.तर काही ठिकाणी वनविभाचेच अधिकारी कर्मचारी लाकडांचा अवैध व्यवसाय करतांना दिसत आहेत,या कडे वरीष्ठ अधिकारी लक्ष देतील काय?असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
