लोणार येथे भाजप कडून ओबीसी राजकीय आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.न्यायलयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे ५६ हजार ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण संपुष्टात आले आहे.आरक्षण ची बाजू महाविकास आघाडी न्यायालयात मांडू शकली नाही त्यामुळे पुढे राज्यातील पाच जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ घातलेल्या निवडणुका रद्द करण्यात याव्यात अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वात राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे व ओबीसी समाजाला न्याय मिळे पर्यंत लढणार असे लोणार तालुका चे प्रभारी सुभाष घिके साहेब यांनी सांगितले.यावेळी जिल्हा सचिव निर्मल संचेती,जिल्हा सदस्य शिवाजी सानप,जेष्ठ नेते भगवान सानप,जिल्हा नेते विजू मापारी जेष्ठ नेते प्रकाश मुंढे,तालुका अध्यक्ष बाबाराव मुंढे,युवा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप,प्रकाश नागरे,माऊली मुंढे, शहर अध्यक्ष गजानन मापारी,युवा तालुका अध्यक्ष उद्धव आटोळे,सुनील डोळे,दिनकर डोळे,विष्णू डोळे,विनोद थोरवे,जयदत्त एऊल,पंढरी सांगळे,कांगणे,अजीम भाई,बबनराव जाधव,संदीप कुटे,पंकज नागरे,गणेश काकड,अशोक मुंढे,शुभम बनमेरु,गजानन चव्हाण,सूरेश अंभोरे,पांडुरंग मुंढे,गजानन वाघ,मारोतराव सुरुशे,बाळासाहेब कुलकर्णी,केशवराव डेव्हढे सह बहुसंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
