बातमीपत्र

*विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना फवारणी बाबत मार्गदर्शन* *ह्युमनकाईंड* *डेव्हलपमेंट चा उपक्रम*

*खळेगाव* :- लोणार येथून जवळच असलेल्या सोमठाणा येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित गीताई ह्यूमन काईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित कृषी महाविद्यालय आमखेडा अंतर्गत कृषिदूत नागेश जगन निखाडे यांनी सोमठाणा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फवारणी बाबत घेण्यात येणाऱ्या योग्य काळजी बाबत नागेश जगन निखाडे या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी पिकावर फवारणी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी जेणेकरून दुष्परिणाम टाळता येतील व कीटकनाशक फवारताना योग्य ती खबरदारी कशी घ्यावी फवारणी करताना शेतकऱ्यांनी शुद्ध पाण्याचा वापर करावा याबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले यावेळी शेतकरी सुखदेव शिंदे, गणेश बागडे, रमेश शिंदे, तुकाराम शिंदे, जगन शिंदे, हे उपस्थित होते या प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अतुल मुराई सर व कार्यक्रम अधिकारी प्रा शशिकांत वाकुडकर तसेच प्रा डी टी बोरकर सर व इतर प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा