सुलतानपूर :- गीताई हुमनकाइंन्ड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा ता. मालेगाव जि. वाशिम येथील सातव्या सतराच्या विद्यार्थ्यांनी कृषी जागृतता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2021- 22 अंतर्गत कोरोनाविषाणू नियमाचे पालन करून कृषिदूत गणेश घोडके ,नागेश निखाडे ,अजय राजगुरू, अक्षय निखाडे यांनी 19 सप्टेंबर रोजी सुलतानपूर येथील गणेश राजगुरू प्रत्यक्ष यांच्या शेतात भेट घेऊन त्यांना व इतर शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले. कापूस पीक साधारण 40 ते 45 दिवसाचे झाल्यानंतर बोंड अळी चा प्रादुर्भाव दिसून येतो. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांची नुकसान होऊ नये यासाठी कपाशी पिकात हेक्टरी सहा ते सात कामगंध साबळे शेतकऱ्याने लावावी व शक्यतोवर कपाशीच्या फरदळीचे उत्पादन घेऊ नये. आर्थिक नुकसान पातळी आठ पतंग साप प्रति दिवस सतत तीन दिवस किंवा एक अळी प्रति दहा फुले ही वेगळी प्रति दहा बोंडे ही पातळी ओलांडल्यास शिफारशीत पुढील कीटकनाशकांचा वापर करावा. *प्रमाण प्रति 10 लिटर पाणी* १) प्रोफेनोफोस (५० ईसी )30 मिली २) थायोडीकार्ब (75 % डब्ल्यूपी)- 20 ग्रॅम ३) प्रोफेनोफोस 40 % + सापरमेथिन ४ टक्के ईसी 10 मिली ४) लंम्बडा सायहॅलोथीन ( ५ ईसी) ६ मिली कीटकनाशकान विषयी शेतकरी वर्गास मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला कैलास शिंदे ,सागर जुमडे, गणेश भागडे, शंकर निखाडे व इतर शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अतुल मुराई , विषयतज्ञ प्राध्यापक डी. टी. बोरकर प्राध्यापक निचळ, कार्यक्रम समन्वयक प्रा. समाधान कव्हर , कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत वाकुडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
साप्ताहिक बातम्या
सुलतानपुरनगरीत ७० वा...
Oct 23, 2026
विभागीय वन अधिकारी, वन्यजीव,...
Oct 23, 2026
सुलतानपुरनगरीत...
Oct 23, 2026
