बातमीपत्र

मैदानी खेळातुन शारीरिक क्षमतांचा विकास - जि.प.सदस्य दिनकर बाप्पु देशमुख,भंडारी येथे कबड्डीच्या खुल्या सामन्यांचे आयोजन,वरुड संघाने पटकावले पहिले बक्षीस ग्रामीण भागात मैदानी क्रिडा स्पर्धेला वावं मिळावा या हेतुने दिवाळी सणाचे औचित्य साधुन सिंदखेड राजा तालुक्यातील भंडारी येथे कबड्डीच्या खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या खुल्या सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.या खुल्या सामन्यात अनेक संघानी भाग घेतला. या सामन्याच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बक्षीस वितरण जि.प.सदस्य दिनकर बाप्पु देशमुख आणि पंचायत समिती उप सभापती बद्रीभाऊ बोडखे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.पहिले पारितोषिक बक्षीस 10111/- वरुड येथील संघाने पटकावले,द्वितीय पारितोषिक बक्षीस 7111/- ईसवी या संघाने पटकावले,त्रुतीय पारितोषिक नासिक बक्षीस 5111/- या संघाने पटकावले.कबड्डी स्पर्धेचे आयोजन लोकनेते गोपिनाथ मुंढे प्रतिष्ठान भंडारी व पंचशिल मित्र मंडळ भंडारी यांनी केले होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा