दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी भंडारी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाप्रयान दिनाचे औचित्य साधून समस्त बौद्ध धम्म उपासक उपासिका यांनी सम्यक संकल्प करून बाल धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करून बुद्धिष्ट संस्कार केंद्राचे उद्घाटन करून महामानवाला शैक्षणिक,संस्कारमय मानवंदना दिली.सविस्तर वृत्तांत असा की मौजे भंडारी येथे पूजनीय भिक्खु एस.धम्मसेवक थेरो यांच्या वाणीने प्रेरणेने प्रभावित होऊन त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समस्त बौद्ध जनांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.आयु.दिनकर बाप्पु देशमुख जि.प.सदस्य बुलढाणा हे होते.त्याच बरोबर कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.भंडारी येथील ग्रामसेवक सुनील सानप,उपसरपंच गणेश घुगे व सर्व सदस्य भंडारी तसेच कंडारी येथील सरपंच संपत पवार,उपसरपंच मदन कायंदे,शिवाजी खरात तसेच परिसरातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मोरे आणि प्रास्ताविक संतोष मोरे ग्रामपंचायत सदस्य भंडारी यांनी केले.
