बातमीपत्र

जि.प प्राथमिक शिक्षक पतसंस्था सिंदखेडराजाच्या वतीने मयत शिक्षकाच्या वारसास 11000/- रुपयाची मदत

जि.प.प्राथमीक शिक्षक पतसंस्था सिंदखेड राजाचे सभासद कालकथीत दिनकर चव्हाण यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा असा आप्तपरिवार आहे.त्यांच्या अकस्मात जाण्यामुळे त्यांच्या कुंटुबाला फार मोठा धक्का बसला. पतसंस्थेच्या वतीने त्यांची पत्नी मंदा दिनकर चव्हाण यांना त्यांचे घरी जाऊन आर्थिक मदत म्हणुन पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.नंदकिशोर शिंगणे व उपाध्यक्ष अशोक नागरे यांचे हस्ते 11000/-(अकरा हजार) रुपयांचा चेक देण्यांत आला.पतसंस्था ही सुख दुःखात सर्व सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभी असते.सभासद हा पतसंस्थेचा आत्मा असून तोच खरा मालक आहे. हेच ब्रीद घेऊन पतसंस्था मार्गक्रमण करीत आहे.यावेळी पतसंस्थेचे संचालक टी.के देशमुख, लिंबाजी तायडे,डि. के .राठोड, संतोष सोनुने व  तुपकर सर इत्यादि हजर होते.

श्री. सुधाकर डोंगरदिवे 
     सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी
श्री. दर्शनकुमार गवई
      सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी 
Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा