बातमीपत्र

पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर येथील शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबास बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार मदन येरावार यांनी सांत्वनपर भेट दिली. या भेटीत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आस्थेने विचारपूस केली शहीद नितीन राठोड यांच्या पत्नीस व भावास शासकीय सेवेत सामावून आश्वासन त्यांनी यावेळी दिले व कुटुंबाच्या काही समस्याच असतील त्या शासनाद्वारे सोडविण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले.गावकऱयांनी गावात शहीद स्मारक बनविण्याचा प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले गावकऱयांनी एकमताने एखांदी जागा ठरवावी इमारत बांधण्याकरिता सर्व खर्च शासनाकडून केला जाईल असे आश्वासन देऊन त्यांच्या ताफा साखरखेर्डा लव्हाळा मार्गे चिखली येथील शहीद वाघमारे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी रवाना झाला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा