चिखली भाऊराव वानखेडे यांच्या मेहकर ते चिखली मार्गावरील शेतातील विहिरीत सकाळी ११च्या सुमारास बाभूळखेड येथील सौ. मनीषा अंकुश गायकवाड वय २४ वर्ष व समर्थ अंकुश गायकवाड वय 4 वर्ष यांचा मृतदेह आढळून आला,तर यातील मृतक मानिषाच्या अजून एका मुलाचा या विहिरीमध्ये शोध घेणे सुरू आहे अंतर्गत कलहातून चार जणांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असता शोधकार्य सुरु केले परंतु एक व्यक्ती बाहेगावी असल्याचे कळाल्याने लहान मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरु होता सदर विहिरीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने व विहीर ९५ फूट खोल असल्याने मृतदेह शोधण्यात अडचण निर्माण होत होती दोन मोटारीच्या साहायाने पाणी उपसण्याचे काम सुरु आहे दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यत्क्त होत आहे अद्याप आत्महत्येचे कारण समजूशकले नाही याप्रकरणी शोधकार्य पोलिसांच्या माध्यमातून सुरु आहे.
