बुलडाणा पो.स्टे. धाड हद्दीतील मौजे तराडखेड येथील जातीयवाद्यांनी बौद्ध समाजाच्या नियोजित बुद्ध विहाराच्या जागेतील धम्मध्वज काढून आंबेडकर समाजाच्या भावना दुखावल्याने दोन समाजात तेढ निर्माण करणार्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी रिपाइं (ए) गटाच्या वतीने जिल्हामहासचिव बाबासाहेब जाधव, विदर्भउपाध्यक्ष संजय वाकोडे,जिल्हाकार्यध्यक्ष मुरलीधर गवई, सचिव विजय सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना ३१ जानेवारी रोजी दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.सदर जागा ही ग्रामपंचायतने २०१३ मध्ये नियमानुसार ठराव घेवून बौद्ध समाजाला देण्यात आली होती. त्यानुसार ग्रामस्थ व लोक प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत धम्मध्वज लावण्यात आला होता.
