बातमीपत्र

काल दिनांक 14 फेब्रुवारी रोजी जम्मू कश्मीर येथील पुलवामा याठिकाणी नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड हे जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे नक्षलवादी हल्ला झाला त्यात भारतीय सेनेतील जवळपास 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात लोणार तालुक्यातील बीबी येथून जवळच असलेल्या गोवर्धन नगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड नामक तरुण भारतमातेच्या कामी आला. नितीन केंद्रीय राखीव दलाच्या तीन बटालियन मध्ये 2006 ला आसाम मध्ये भरती झाला होता. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील आश्रमशाळेत झाले होते. तर उच्च माध्यमिक शाळा शिक्षण त्यांनी दुसरबीड येथील जीवन विकास महाविद्यालयातून पूर्ण केले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीनला लहानपणापासूनच सैनिकी सेवेची आवड होती.त्याचे पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असून आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.संपूर्ण गाव व परिसरात शोककळा पसरली आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा