पुलवामा कश्मीर येथे आतंकवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन सुपुत्रांना वीर मरण प्राप्त झाले आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा दुःखाच्या सावटाखाली असल्याने आज बुलडाणा शहरात अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करून सद्धभावना रॅलीद्वारे शहिदांच्या कुटुंबियांसाठी रिलीफ फंड म्हणून एक लाख रुपये गोळा करण्यात आले. ही रक्कम लवकरच शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहिदांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात येणार आहे. : बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी शिवजयंती हा उत्सव सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र देशावर ओढवलेल्या संकटाला समोर ठेवून बुलडाणा शहर शिवजयंती उत्सव समितीने यावर्षी शिवजयंती ही साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतलाय... यामध्ये आज सकाळी शहरातील स्थानिक गांधी भवन येथून जयस्तंभ चौक,बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक मार्गे हुतात्मा स्मारक वर जाऊन शहिदांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहिली. व तिथे राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सियाचीन मधील शहिद अनिल वाघमारे व पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शहिद संजय राजपूत आणि नितीन राठोड या वीर जवानांच्या कुटुंबियांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून निधी गोळा करण्यात आलं. यात अवघ्या तीन तासात एक लक्ष रुपयांचा निधी गोळा झाला यामध्ये सर्वच समाजाच्या नागरिकांनी सढळ हाताने मदत केली. ही रक्कम लवकरच शिवजयंती उत्सव समितीच्या असते शहिदांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात येणार आहे.या रैलीत शहरातील सर्वच समाजाचे नागरिकांनी सहभाग घेतला.
