सिंदखेडराजा येथील जिजामाता ज्युनियर कॉलेज व जिजामाता विद्यालय कर्मयोगी कै.पुंजाजी बाबा तायडे बहुउदेशीय संस्था कॉलेज व विद्यालयच्या विद्यार्थ्यांची स्कूल बस सकाळी सावरगाव माळ वडगाव वखारी पवार तांडा येथील पालकांनी सिंदखेडराजा रोड वर अडवली असता बस मध्ये ५६ विदयार्थ्यांच्या आसनाची व्यवस्था असताना या बस मध्ये चक्क १३० विदयार्थी जनावरांसारखे कोंबले होते त्यामुळे पालकवर्गात संतापाची लाट पसरली या बाबत शाळेच्या संचालकांना विचारणा केली असता कोणतेही उत्तर देत नसल्याचे दिसून आले.पालकांनी हे सर्व गप्प पाहत राहण्याखेरीज कोणताही पर्याय नाही अशी माहिती यावेळी दिली जर कोणत्या पालकाने या विरुद्ध आवाज केला तर त्याच्या पाल्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी शिक्षक देत असल्याची बाब उघड झाली एवढा जीवघेणा प्रकार सुरु असताना देखील याकडे प्रशासनाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे तर शासनाला एखांदा अपघात झाल्याशिवाय जाग येत नाही असा आरोप पालक संघटनेने केला.
