बातमीपत्र

संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या भोन गावात मौर्य कालीन प्राचिन बौध्द स्तूप व प्राचिन वास्तू उत्खननात मिळाल्या आहेत परंतु हे उत्खनन शासनाने तांत्रीक कारणांमुळे थांबवीले आहे. शासनाने हे उत्खनन पुन्हा सुरू करावे,व मौर्य कालीन प्रचिन बौध्द स्तूप उजेडात आणावा. तसेच प्राचीन अवशेषांचा पुरातत्त्व विभागाकडून जीर्णोद्धार करावा. असे निवेदन बुध्दिस्ट इंटरनेशनल नेटवर्कच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी शहरातून भव्य रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या रॅलीत विनोद इंगळे,पुरूषोत्तम बोर्डे, बाबासाहेब जाधव, दिपक मोरे, प्रा. गौतम आंभोरे, शाहीर वा.का. दाभाडे, महानंदा चौतमल, आशिष खरात, सुनिता मोकळे, बी.के. इंगळे, प्रा. खंडेराव, उषा कांबळे, कमल मोकळे, संगीता सपकाळ, नलिनी तायडे, शिलाताई कांबळे, विनोद इंगळे, सिंधुताई अंभोरे, व्दरकाबाई सरकटे, मनोज ठाकरे, अजय पडघान, निलेश राऊत, लता गवई, संतोष खराटे, मधुकर आराख, शैलेश वानखेडे, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


आमच्यात सामील व्हा