बातमीपत्र

भंडारी गावांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस असा पाऊस गेल्या वीस वर्षांमध्ये पडलेला नाही असे ग्रामस्थ सांगत आहेत.आखरावरुन गावांमध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावर खूप मोठया प्रमाणात पाणी असल्याने गावकऱयांचे प्रचंड हाल होत आहेत.साधारणता २००६ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता ग्रामस्थांची पावसामुळे गैरसोय झालेली आहे त्यांचा जाण्याचा येण्याचा संपर्क काही वेळेसाठी स्थगित झाला होता या पावसामुळे शेतातील आलेले पीक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे शेतकऱ्याकडून शेतीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी होत आहे कारण सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.बैलपोळा पासून सतत पाऊस सुरू असून या पावसाचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे.


आमच्यात सामील व्हा