पावसामुळे मंठा तालुक्यातील वझर सरकटे,पोखरि,किर्ला,वाघाला,टाकलखोपा,इंचा,लिंबखेडा,कानडी,ऊस्वद सह काही गावातील शेतकरी यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.खडक पूर्णा धरण भरल्या मुळे त्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला.पूर्णा नदि दुधडी भरून वाहिली त्या मूळ काही ठिकाणी असलेल्या kt चे दरवाजे बंद असल्या मुळे पाणी शेतात जाऊन शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष्य देणे गरजेचे होते पण तसे झालेले दिसले नाही आपण स्वतः हि सर्व पाहणी केली असुन दोषी अधिकारी यांच्यावर कार्यवाही करून शेतकरी यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना नामदार बबनराव लोणीकर यांनी दिल्या असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी दिली.
