वाशी नवी मुंबई येथे दिक्षार्थी मुमुक्षु कु.पूजा सुभाषसिंगजी मुनोत मेहकर निवासी यांनी वाशी नवी मुंबई सिडको प्रदर्शन केंद्र येथे ओसवाल जैन ट्रस्ट द्वारा आयोजित प.पू.श्री.सुमतीप्रकाशजी म.सा.डॉ.विशाल मुनी म.सा.व.साधवी म.सा.यांच्या उपस्थितीत जैन भगवती दीक्षा कार्यक्रम असंख्य जैन बांधवांच्या उपस्थिती पार पडला या कार्यक्रम प्रसंगी जैन भगवती दीक्षा निमित्ताने दिक्षार्थी कु.पूजा ने या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संपूर्ण मानव जाती माझा परिवार आज पासून झाला असून मी मानव धर्म प्रति धार्मिक प्रचार प्रसार व मानव कल्याण साठी प्रयत्न करेल या कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
